सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील मौजे पुई येथील अनंत लहाने यांच्या घराजवळ एक दहा फूटी लांब अजगर ठाण मांडून बसला होता हे येथील नागरिकांच्या लक्ष्यात आले असता त्यांनी सर्प मित्र सलीम शब्बीर सय्यद याला फोन करुन बोलवून घेतले व सर्पमित्र सलीम सय्यद यांनी या अजगराला पकडून जंगलात सोडून दिले.
पुई गावातील अनंत लहाने यांच्या घराजवळ एक दहा फूट लांब अजगर ठाण मांडून बसला होता. हे येथील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी त्वरित सर्पमित्र सलीम सय्यद याला फोन करून बोलावुन घेतले.घटनास्थळी त्वरीत सलीम सय्यद उपस्थित होऊन प्रसाद गायकवाड, अनिकेत शिर्के व संतोष दिवेकर याच्या सहकार्याने या अजगराला पकडून जंगलात सोडुन दिले.
स
द्या सापाची संख्या दुर्मिळ होत चालली असल्याचे दिसून येत असुन शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखण्यात जाणारे साप वाचविण्यासाठी सर्पमित्र पुढे येत आहेत या प्रमाणे सर्पमित्र सलीम शब्बीर सय्यद यांनी विविध जातिचे साप पकडून जंगलात सोडून देवून जिवदान दिले आहेत.








Be First to Comment