रक्तदान शिबिरात १०० पिशव्यांचा संकल्प केला पूर्ण 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे तरुण, तडफदार आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला.
कोरोना विषाणुच्या महाभयंकर संकटासोबत सामना करत असताना अत्यावश्यक असलेला रक्ताचा तूटवडा दिसून येत असतानाच नागोठणे विभाग युवक राष्ट्रवादीच्या वतीने आ. अनिकेतभाई तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरा लगतच्या कै. तात्यासाहेब टके सभागृहात रविवार दि. १८ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास आ. अनिकेतभाई तटकरे यांनी भेट दिली.
त्यावेळी या शिबिरात दानशूर रक्त दात्यांच्या सहकार्याने १०२ पिशव्या रक्त जमा झाल्याने १०० पिशव्या रक्त जमा करण्याचा संकल्प पूर्ण करणाऱ्या युवक राष्ट्वादीच्या आपल्या तरुण कार्यकर्त्यांचे आ. अनिकेतभाई तटकरे यांनी कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, हरेषशेठ काळे, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, सुधाकर जवके, बाळासाहेब टके, सुनील लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, विभागीय अध्यक्ष निवास पवार, शहर अध्यक्ष दिनेश घाग, कडसुरेचे सरपंच राजू शिंदे, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, रोहा तालुका अल्प संख्यांक सेलचे अध्यक्ष पप्पूशेठ अधिकारी, राष्ट्रवादी महिला आघाडी नागोठणे शहर अध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, महेंद्र पोटफोडे, राकेश शिंदे, दीपेंद्र आवाद, मनोज ताडकर, पाटणसई ग्रा.पं. सदस्य सचिन कळसकर, नागोठणे ग्रा.पं. सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, मनोज टके, चेतन टके, धृव सोष्टे, किशोर कदम, राष्ट्वादी विद्यार्थी संघटना रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय नागोठणेकर, नागोठणे शहर अध्यक्ष कु.केतन भोय, जगदीश दिवेकर, कुणाल तेरडे तसेच शहर व विभागातील युवक राष्ट्वादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेज व हाॅस्पीटलच्या रक्त पेढीतील डाॅ. सुमेधा शिंदे, डाॅ. विभूती, राजेश पाटील, किशोर म्हात्रे, पुनम जगताप, कु. सुनिता आदींचे सहकार्य मिळाले.








Be First to Comment