Press "Enter" to skip to content

नवरात्री विशेष : उरण मधील नवशक्ती

सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । लेखक – अजय शिवकर । 🔷🔶🔷

आजच्या देवीचे दुसरे रूप

ब्रह्मचारिणी

ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे” या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता.

जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय.

आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे.आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.

मोरा गावची एकविरा ( संजीवनी )

उरण वसविण्यापूर्वीच चंद्रगुप्त मौर्य यांनी जे बंदर वसवीलं ते त्यांच्याच नावाच मोरा बंदर आहे. इथं वसलेल्या मोरा गावच्या डोंगरावर आदि-काळापासुन लेण्यांमध्ये देवीचे मूर्तीरुपी स्थान आहे.

डोंगर व मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात पाषाणावर हातांचे व पावलांचे ठसे आजही पाहायला मिळतात तसेच देवळातुन निघालेला पाण्याचा हौद कुठपर्यंत जातोय हा प्रश्नच आहे. आजही असे म्हणतात पूर्वी डोंगर काजव्या प्रमाणे चमकायचा कारण डोंगरावर खूप औषधी वनस्पती मिळायच्या.

देवीमुळेच नव-जिवण मिळते म्हणून ही संजीवनीदेवी ! पण स्थानिक कोळी लोक तिला आपली कोल्यांची पाठीराखी आई एकविरा पण म्हणतात .

उद्या सोमवार
१९/१०/२०२०
उद्याच्या देवीचे तिसरे रूप — चंद्रघंटा
उद्याच्या देवीची माहिती — करंजाची द्रोणागिरी माता

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.