हाथरस क्रूर सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास करून आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि दलित मुलीच्या हत्येप्रकरणी मुक्त, निष्पक्ष आणि निःपक्षपाती तपास करून , खटला जलदगतीने निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, व पीडित कुटुंबाला नैसर्गिक न्याय द्यावा अशी महत्वपुर्ण मागणी नॅशनल दलित मोव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. तसेच या घटनेचा जाहीर निषेधही दर्शविण्यात आला.
सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रत मा. राष्ट्रपती, मा. प्रधानमंत्री, मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री उत्तरप्रदेश, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र्र , राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली, अनु जाती जमाती आयोग महाराष्ट्र्र राज्य आदींना रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
सदर निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या असून प्रामुख्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पिडीत कुटुंबाला शेवटचा संस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधिक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर , पुरावा नष्ट करणे , तिच्या शेवटच्या संस्कारांचा अनादरकरणे , गैरकायदेशीररित्या बंदी करणे , धमकी देणे , पिडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे या करीता अनुसूचित जाती व जमाती ( अ.प्र . ) अधिनियम आणि नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. , अनुसूचित जाती व जमाती ( अ.प्र . ) सुधारित नियम २०१६ च्या नियम १२ ( ४ ) नुसार पिडीत कुटुंबाला ८,२५,०० / – रु अर्थसहाय्य तत्काळ देण्यात यावे , तसेच ५ एकर जमीनदेवून संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे., गुन्ह्यातील आरोपींना बलात्कार करुन खुन करणे अशाप्रकारचा घृणास्पद गुन्हा करणाऱ्या आरोपींना कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्या करीता पुरावा नष्ट करणाऱ्या , खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि आरोपीना मदत करणाऱ्या जातपंचायत व इतर लोकांचा शोध घेऊन आढळुन आलेल्या सर्व आरोपींना कलम ३ ( २ ) ( ६ ) नुसार सहआरोपी करावे . अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) सुधारित अधिनियम २०१५ च्या कलम ७ ( २ ) नुसार सर्व आरोपींची स्थावर वजंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी .
आदी महत्वपूर्ण मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी पंचशीला कुंभारकर
राज्य महिला संघटक नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चंद्रकांत अडसुळे पेण तालुका अध्यक्ष नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टी प्रदीप पवार अध्यक्ष अलिबाग तालुका नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टी शैलेश शेलार रोहा तालुका अध्यक्ष नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टी संतोष अडसुळे सदस्य ग्रामपंचायत बेणसे, प्रमोद काकडे, विशाल अभंगे,विजय अडसुळे,ज्ञानेश्वर कोळी, अल्पेश शेलार ,जगदीश वाघमारे ,अजय महाले,निलेश शेलार,अनंत फसाळे, आदित्य भगत, आदिनाथ अडसुळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.







Be First to Comment