श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि. १८ः
संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पंचम वेद’ या संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचा जागर संपन्न झाला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाला. पंचम वेद चे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीन वादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. शास्त्रीय गायिका व कवयित्री प्रतिभा शेवडे लिखित आवाहनगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर आरती, देवीची गाणी, भोंडला, जोगवा इत्यादी प्रकारांनी देवीचा जागर करण्यात आला.
प्रसिद्ध गायिका रेणुका दलाल, शलाका देशपांडे, मेधा मनोहर, डॉ. वीणा मनोहर, यांनी गीतगायन केले. विजय मनोहर, गंधार देशपांडे यांनी कलाकारांना सिंथेसायजर आणि अमोल खासनीस यानी तबलासाथ केली. के. व्ही. कन्याविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींनी भोंडल्याच्या गाण्यांवर धरलेला फेर हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. युवा निवेदिका पल्लवी देशपांडे हिने आपल्या ओघवत्या वाणीने भक्तीभावपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची उंची वाढवली. डॉ. निखिल मनोहर व मंजुषा देशपांडे, अॅड्. अतुल जोशी यांनी चित्रीकरण व सहाय्य केले. हा कार्यक्रम पुढील युट्यूब लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. https://youtu.be/UL45hAYu8iA









Be First to Comment