सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत होवून शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे विभागअध्यक्ष रोहिदास लहू भोईर यांनी आपल्या नांदगाव विभागातील कार्यकर्त्यांचा समवेत माजी आमदार मनोहशेठ भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितीत प्रवेशकर्त्यांच्या हाती भगवा झेंडा तसेच शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
माजी आमदार मनोहर_भोईर यांनी उरण विधानसभा हद्दीतील केलेली विकासकामे तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास, बघता इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेकडे वाढत आहे.
यावेळी कार्यकर्त्यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वागत करुन शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे सांगितले. तसेच आपल्या विश्वासाला कधीही तडा जावून देणार नसल्याचे सांगितले. यावेळी गणेश खुटले शाखाप्रमुख, सुरेश खुटले पनवेल तालुकाअध्यक्ष वा.सेना., मनोहर भोईर मा.उपसरपंच, विक्रम फडके विद्यमान सदस्य मा.उपसरपंच, कमलेश पाटील उपशाखाप्रमुख, , अनिल दत्तू शितकंदे उपशाखाप्रमुख, दिपक पाटील शाखाप्रमुख तुरमाले, धनाजी खुटले, पुरषोत्तम खुटले, मंगेश खुटले, निलेश भगत, किरण खुटले, मिथुन शितकंदे, संतोष खुटले, राजेश हुद्दार उपस्थित होते.







Be First to Comment