Press "Enter" to skip to content

चिंचवली तर्फे दिवाली येथे गावदेवी भवानी मातेच्या मंदिरात घट बसले


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷


रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाली येथे घट स्थापनेचे औचित्य साधुन गावदेवी भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना करुन नऊ दिवसांच्या पुण्यवान नवरात्र मोहोत्सवास मोठया भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला आहे.

चिंचवली तर्फे दिवाली येथे गावदेवी भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रात उत्सव दर वर्षी अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो.नऊ दिवस या मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते परंतु शासकिय नियमांनुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले असले तरी गावदेवी भवानी मातेची भक्ती कमी झालेली नाही तिच्या दर्शनासाठी सासरवाशीनी व महिरीवाशीनी गर्दी करतात.

यावेळी सान्वी मालुसरे,उषा मालुसरे, स्मिता मालुसरे,शुभांगी मालुसरे,अनिशा मालुसरे,अंजली मालुसरे,मालती मालुसरे,सपना मालुसरे, वनिता भोसले,ज्योती खोपकर माहेरवाशिन तसेच ग्रामस्थ मंडळ व तरुण मंडळ उपस्थित होते सर्वांनी गावदेवी भवानी मातेची पूजा करून दर्शन घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.