Press "Enter" to skip to content

कोकणातील शेतकऱ्यांसाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर सरसावले


मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केली आहे.

कोकणात आलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे व इतर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेती लागवडीचा खर्च पहाता शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही उरत नाही. त्यात आलेले पीक ही पावसाने हिरावून घेतले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शासनाने भातशेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करून मुदतही संपली आहे.
परतीच्या आलेल्या पावसामुळे रायगड मधील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाईचे अर्ज भरण्याची दिनांक १५ ऑक्टोबर होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना ते भरता आलेले नाहीत त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यासाठीची मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केली आहे. अशा प्रकारची मागणी उरण सामाजिक संस्थेनेही केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.