Press "Enter" to skip to content

धनंजय कवठेकर यांची राष्ट्रवादीच्या अलिबाग तालुका उपाध्यक्षपदी निवड

 सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । प्रतिनिधी । 🔷🔶🔷

अलिबाग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, रायगड भुषण पुरस्कार प्राप्त धनंजय अरविंद कवठेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांच्या हस्ते निवडीचे प्र्‌माणपत्र बहाल करून त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष  सुधाकर घारे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गिता जाधव, अशोक भोपी,प्रमोद सांदणकर, नरेश पाटील, चंद्रकांत टोपले आदी जिल्हयातील तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

धनंजय कवठेकर गेल्या १५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवून समाज घडविण्याचे  काम कवठेकर यांनी केले. महिला सक्षमीकरणाबरोबरच महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने  रायगड भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

राष्ट्रवादीच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन खासदार सूनील तटकरे, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांच्या नेतृत्वाखाली कवठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.