Press "Enter" to skip to content

जागतिक स्तन कर्करोग जागरुकता महिना- ऑक्टोबर २०२०

कोरोना संक्रमण काळामध्ये मुंबईतील महिला कर्करोग रुग्णांची होत आहे परवड  वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे अनेक रुग्णांनी थांबविले उपचार 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी । 🔷🔶🔷

कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी व महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया वाढू लागल्या असल्या तरी आजही त्या पुरेशा वेगाने होताना दिसत नाही, त्यामुळे कर्करोग रुग्णाची परवड होताना दिसत आहेत.

मुंबईतील अपेक्स हॉस्पिटल समूहातील बोरीवली येथील अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लीनिकने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक कर्करोग रुग्णांची परवड झाल्याचे समोर आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स सुपर स्पेशालिटीच्या लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ अदिती अग्रवाल म्हणाल्या, ” गेल्या सहा महिन्यात अनेक कर्करोग रूग्णांनी कोरोना संक्रमणाच्या भीतीने पुढे ढकलल्या त्यामुळे अनेक रुग्णांना याचा त्रास होताना दिसत आहे. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेरनेस म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरुकता आणण्यासाठी पाळला जातो व याच निमित्ताने आम्ही पश्चिम उपनगरात महिलांचे एक मोफत सल्ला शिबीर (ऑनलाईन ) व एक सर्वेक्षण केले,  या सर्वेक्षणामध्ये आम्ही मालाड ते पालघर मधील महिलांशी फोनवर बोलून त्यांच्या समस्या जाणवून घेतल्या असता अनेक महिलांनी कर्करोगाची ठळक लक्षणे आढळून आली असतानाही लॉकडाउन असल्यामुळे पुढील तपासणी अथवा उपचार घेतले नाहीत.

नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेला  मे  महिन्यात डाव्या स्तनामध्ये ३ सेन्टीमीटरची गाठ आढळून आली होती, परंतु वाहतुकीची साधने नसल्यामुळे तिने पुढील उपचार केले नाही, तीन महिन्यांनी जेंव्हा ती उपचारासाठी आली  तेंव्हा ही गाठ डबल आकाराची झाली होती. एक कर्करोगग्रस्त महिलेने वाहतुकीची सोय नसल्यामुळे रेडिओथेरेपी थांबविल्याचे आमच्या लक्षात आले. एक मुलगी आपल्या भावासोबत लॉकडाउन काळामध्ये रेडीएशन थेरपी घेण्यासाठी जात होती परंतु तिच्या आईला कोरोना झाला व तिने आपली ट्रीटमेंट थांबविली कारण तिला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले गेले होते. आम्ही अनेक महिलांशी बोलून त्यांना आपले उपचार परत सुरु करण्यास सांगितले तसेच अनेक महिलांना आम्ही रोज फोनवरून समुपदेशन करीत आहोत.”

कर्करोग हा आता पूर्वीसारखा गंभीर आजार राहिलेला नाही कारण भारतामध्ये अनेक आधुनिक उपचार उपलब्ध असून कर्करोगावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य झाले आहे परंतु भीती व लाजेपायी आजही ६० टक्के रुग्ण अंतिम टप्प्यामध्ये कर्करोग आल्यानंतर डॉक्टरकडे येतात, अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे कठीण होऊन जाते. लॉकडाउन काळामध्ये कर्करोगच नाही तर अनेक गंभीर रोगांवर दुर्लक्ष झाले आहे याच सामाजिक जाणिवेतून  अपेक्स ब्रेस्ट कॅन्सर क्लीनिकतर्फे आम्ही हा उपक्रम राबविला असून अनेक महिलांना आम्ही ऑनलाईन तसेच फोनवर मार्गदर्शन करीत आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.