आमदार अनिकेत तटकरेंच्या वाढदिवशी विजेत्या स्पर्धकांचा सन्मान 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्याजवळील वणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व स्वच्छता या विषयांवर जनजागृतीसाठी गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत वणी गावासह वणी ग्रामपंचायत हद्दितील चेराठी वाडी, गोयंडा वाडी व काळकाई वाडी या आदिवासी वाड्यांमधील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील वणी गावासाठी असलेल्या पहिल्या गटात कु. योगेश गोसावी, श्री. रोहिदास आवाद व कुमारी सेजल आवाद यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. तर तीन आदिवासी वाड्यांमधील दुस-या गटात कु. अनिल हरिश्चंद्र निरगुडे, कु. एकनाथ सदानंद हंबीर व कु. गणेश तुकाराम शिद यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले.
या ऑनलाइन पोस्टर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन वणी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रगती दिपेंद्र आवाद यांच्याकडून वणी गावातील श्री कालभैरव मंदिरास साऊंड सिस्टीम भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील जेष्ठ नागरिक व माजी सरपंच लक्ष्मण खाडे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप आवाद, महादेव शेट्ये, दिपक वनकर, संजय नवघरे, दिपेंद्र आवाद, सुरेश पारधी, वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रगती दिपेंद्र आवाद, उपसरपंच महेंद्र हंबीर, सदस्या दिपीका वनकर, सदस्य संतोष रेवाले, लक्ष्मण आवाद, गणेश वनकर, ग्रामसेविका निलिमा म्हात्रे, अंगणवाडी सेविका, कर्मचारी व स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक यावेळी उपस्थित होते. वणी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







Be First to Comment