रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा व नुकसान भरपाई देऊन बळीराजाला दिलासा द्या – भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
परतीच्या पावसाने पाली सुधागड सह रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. यामुळे येथील शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या भाताचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसान भरपाई देऊन बळीराजाला दिलासा द्या अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा (पाली सुधागड ) यांनी केली असून विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या काळात शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले होते, घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले, या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले. पेरणी व कापणीचा खर्च ही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. जगावे की मरावे या द्विधामनःस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला शासन मदतीची अपेक्षा आहे. या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी या करिता भाजप आक्रमक झाले आहे.
त्या अनुषंगाने राजेश मपारा यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. व शेतकऱ्यांची व्यथा मांडून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून योग्य नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी याबाबतचे निवेदन दिले आहे.







Be First to Comment