राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केला प्रवेश
पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांनी केले पक्षात स्वागत.
पनवेल: जागृती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अमिता चौहान यांनी १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपा ला अलविदा करत त्यांनी हातावर घड्याळ बांधले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी असंख्य महिला कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी अदिती ताईंच्या हस्ते महिला आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना अमिता म्हणाल्या की,महिलांचे सक्षमीकरण करणे,त्यांच्यावर अन्याय होत असल्यास त्यांना न्याय मिळवून देणे हे माझे एकमेव ध्येय्य आहे. भाजपा मध्ये असताना देखील मी माझे काम प्रामाणिक पणे करत होते.परंतु येथील भाजपा च्या मंडळींना माझ्या कार्याची किंमत नाही.त्यामुळे मी त्यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहे.त्या पुढे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरासाठी कटिबध्द आहे.आम्हाला विश्वास आहे की आमच्या संस्थांनी उभारलेल्या कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून बळ मिळेल.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,पनवेल जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील,ओबीसी सेल चे प्रदेश अध्यक्ष इशलबल बाबुधे,नवी मुंबई अध्यक्ष अशोक पवार,सुहास उबे, राजापुरकर,नगर सेवक विजय खानावकर,सलीम बेग,ओबीसी सेल चे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल,बळीराम नेटके,रुपेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.









Be First to Comment