कारवाईस विलंब होत असल्याने रायगड ज्यू इस्त्राएल समाजाचा आक्रमक पावित्रा : सुधागड तहसीलदारांना निवेदनाद्वारे बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा 🔷🔶🔷
जांभुळपाड्यातील ज्यू इस्त्राएल समाज दफणभूमीच्या थडग्यांची नासधूस करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : रायगड ज्यू इस्त्राएल असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील ज्यु इस्त्राएल समाजाच्या दफणभूमीतील थडग्यांची नासधूस केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रायगड ज्यू इस्त्राएल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर कारवाईस विलंब होत असल्याने रायगड ज्यू इस्त्राईल समाजाच्या वतीने नोएल सॅमसन चिंचोलकर व शालोम मायकल पेणकर हे पाली सुधागड तहसिल कार्यालयासमोर दि.9/11/2020 रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंबंधी चे निवेदन पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना देण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांना देखील या प्रकरणी निवेदन देण्यात आले व सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच येथील श्री गणपती देवस्थान जांभूळ पाडा यांचे मालकीच्या जमिनी बेकायदेशीरपणे दस्त नोंदविल्या असल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मौजे – जांभुळपाडा , सर्व्हे नं .१६४ , हिस्सा नं .३ अ , क्षेत्र ०-३५-० हे.आर अशी मिळकत ज्यू इस्त्राएल समाजाचे मालकी वहिवाटीची असून त्या मिळकतीत दफन भूमी असून , शासनातर्फे ग्रुप ग्रामपंचायत जांभुळपाडा , यांस या दफन भूमीची देखरेख करणेसाठी नेमून दिलेले आहे . वरिल विषयांबाबत दि .११ / ०२ / २०१ ९ , ०८ / ०३ / २०१ ९ , २६ / ०४ / २०१ ९ व १३/०७/२०२० रोजींचे पत्रव्यवहार वारंवार केलेले आहेत . तसेच वरील विषयांमध्ये श्री . प्रसन्न लोढा व अन्य सहा यांचेवर आमचे मसणवटयामध्ये घुसुन जे.सी.बी व्दवारे तार कंपाउंड तोडून आमच्या पुर्वजांचे थडग्यावरील दगडी उडवून मसणवटयाची नासधुस केलेबाबत दि .०१ / ०२ / २०१ ९रोजी भा.द.वि.कलम २ ९ ७ , ३४ अन्वये , एफ . आय . आर . कं ० ९ / २०१ ९ अशी नोंदवलेली असुन आज पर्यंत २१ महिने होवुन सुध्दा श्री . प्रसन्न लोढा व अन्य सहा यांचेवर मे . न्यायालयात दोषारोपपत्र केले नाही /तसेच कोणतीही कारवाई अदयाप झालेली नाही . तसेच ग्रुप ग्रामपंचायत जांभुळपाडा यांना सुदधा आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून देखील वरील विषयांबाबत ग्रुप ग्रामपंचायत जांभुळपाडा यांनी श्री . प्रसन्न लोढा यांचेवर कोणतीही कारवाई केलेली नाही . उलट श्री प्रसन्न लोढा यांनी आमचे समाजाच्या दफनभुमीचे दक्षिण दिशेला असलेल्या मिळकतींचे मालक श्री.गणपती देवस्थान जांभुळपाडाचे विश्वस्त यांचे सोबत संगनमत करून खोटी कागदपत्र तयार करून श्री.गणपती देवस्थान जांभुळपाडा यांचे जागेचे तथाकथित खरेदी दस्त क्र .१४८ ९ / २०१५ शासनाची कोणतीही परवानगी न घेता नोंदविले असल्याचे रायगड ज्यू इस्राएल असोसिएशनने दिलेला निवेदनात केला आहे.
दरम्यान शासनाची कोणतीही परवानगी नसले कारणाने सदरच्या दस्ताची नोंद महसूल कायद्याचे तरतुदीचा भंग केलेने फेरफार नोंद फेटाळण्यात आली होती . वास्तविक सदरच्या मिळकती या शासन जमा होणे गरजेचे होते परंतु तसे न करता दिं .३ / ० ९ / २०२० रोजीच्या मा.जिल्हाधिकारी अलिबाग यांची दिशाभूल करून कायद्याचे पालन न करता परवानगी घेवुन श्री . प्रसन्न लोढा यांनी सदच्या मिळकती त्यांचे नावावर करून घेतल्या आहेत . आमचा समाज अल्प संख्येत असून , महाराष्ट्रात आम्ही खूपच अल्प असल्या कारणाने त्याचा फायदा श्री . प्रसन्न लोढा सारखे धनवान लोक घेत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे. संबंधितांवर शासन कोणतीही कारवाई करत नाही म्हणून त्यांचे अधिक फावले आहे . कारवाई करणे दूर परंतु शासनाचे अधिकारी त्यांना मदत करत असल्याचे निदर्शनात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे .

या सर्व गोष्टींवरून आमचे समाजाला शासना कडुन कोणताही न्याय मिळणे शक्य नाही . अशी खात्री झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. रायगड ज्यू इस्राएल समाजावर शासनाचे संबंधीत अधिकारी यांनी घोर अन्याय केला असून शासनावर आमचा यापुढे विश्वास राहिला नाही . सबब शासनाचे संबंधीत अधिका – यांचा धिक्कार करणे व प्रसन्न लोढा यांचेवर योग्य ती कारवाई व्हावी या मागणीसाठी श्री . नोएल सॅमसन चिंचोलकर रा . पाली सुधागड , व श्री . शालोम मायकल पेणकर , रा . पेण , हे दि .० ९ / ११ / २०२० पासून पाली सुधागड तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.
सदर निवेदनाच्या प्रत राज्याचे मुख्यमंत्री , महसूल मंत्री, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, प्रांताधिकारी रोहा यांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती नोएल चिंचोलकर यांनी दिली.







Be First to Comment