सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकूर । 🔷🔶🔷
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षाच्या उरण तालुका ओ, बी, सी सेल अध्यक्ष पदी मच्छिंद्र ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांच्या उपस्थितीत देण्यात आले .
त्यांनी गाव पातळीवर समस्या, एस .ई .झेड , नैना प्रकल्प, एम .आर .डी .ए तसेच कामगारांचे प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे . शरद पवार साहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन समस्या सोडविण्याचे कार्य करत आहेत .
त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, विधान सभा अध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, तालुका अध्यक्ष मनोज भगत, कार्याध्यक्ष रमण कासकर, युवक ता .अध्यक्ष समाधान म्हात्रे, संजय परदेशी, नामदेव मढवी (ता .सरचिटणीस ), सुरेश पाटील (विभागीय अध्यक्ष ), दिपक पाटील , रत्नाकर म्हात्रे, प्रदीप तांडेल (ता .संघटक ), सुनील घरत, निलेश ठाकूर आदी सह मित्र परिवार तसेच तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .







Be First to Comment