सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजनाच्या प्रथम लाभार्थी सिद्धी सचिन वारंगे ह्या ठरल्या आहेत, त्यांना 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या संकल्पनेतून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजना राबवण्याचा स्तुत्य उपक्रम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नगरपरिषद क्षेत्रात या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये समावेश असलेल्या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाल्यास तिच्या उपचारासाठी आणि पौष्टिक आहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर रक्कम पाच हजार वर्ग करून सदर योजनेचा लाभ देणार आहे. सदर योजना 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे.
या योजनेच्या लाभाकरिता पुढील कागदपत्रे आवश्यक असतील. लाभार्थ्यांचे अर्ज, रहिवासी दाखला, मुलीचा जन्म दाखला, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, दारिद्र्य रेषेखालील दाखला, आधार लिंकची पासबुकची छायांकित प्रत.
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रथम लाभार्थी सिद्धी सचिन वारंगे यांना काल दि.15 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, महिला बालकल्याण सभापती प्राची डेरवणकर, पाणी सभापती बळवंत घुमरे, बांधकाम सभापती विवेक दांडेकर नगरसेवक राहुल डाळींबकर,सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका संचिता पाटील, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या उपस्थितीत सदर योजनेचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी नगर परिषदेचे कर्मचारी अरविंद नातू, सुदाम म्हसे, अविनाश पवार, रविंद्र लाड, सारिका कुंभार, कल्याणी लोखंडे, ऋषिता शिंदे आदी उपस्थित होते.







Be First to Comment