Press "Enter" to skip to content

पेण तालुक्यात विजेच्या कडाडासह मुसळधार पाऊस

महावितरणा कडून विद्युत पुरवठा खंडीत शेतीचे नुकसान तर मोबाईलचे नेटवर्क हि बंद झाल्याने नाराजी 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार । 🔷🔶🔷

पेण तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दैना उडाली आहे.सोसाट्याचा वारा  तसेच विजेच्या कडकडासह पाऊस पडत असल्याने भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु सुदैवाने अद्याप तरी तालुक्यात कुटली हि दुर्दैवी घटना घडली नसली तरी मुसळधार पावसामुळे मात्र शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच विद्युत पुरवठा महावितरणा कडून खंडीत करण्यात येत आहे. दोन दिवसा पासुन सर्वच मोबाईलचे नेटवर्क धिम्या गतिचे झाले आहेत तर नामंकित कंपनीचे नेटवर्क व रेंज गायब झाले असल्याने मोबाईल युजर्स हैराण झाले आहेत.

मोबाईलची रेंज नसल्याने संपर्क हि तुटला आहे तसेच नेटवर्किंग कामेही थांबली आहेत.पेण तालुक्यात काल बुधवार पासून अवकाळी मुसळधार पाऊस सुरु झाला असुन विजांचा कडकडाट हि सुरु असुन जोरदार वारे हि वाहत आहेत तर हवामान विभागाने हि चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतात पाणी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.महावितरणा कडुन हि रात्रीच्या वेळी तसेच वादळी वाऱ्यामुळे विज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.तर अद्याप तरि सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसली तरी मुसळधार पाऊस पडणार असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पावसा फटका मोबाईल टॉवर्सना बसला असुन मोबाईल नेटवर्क व रेंज हि बंद झाल्याने संपर्क तुटत आहे.यामुळे  मोबाईल व नेट युजर्स मध्ये नाराजी मोबाईल कंपनी विरोधात नाराजी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.