कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुधागडातील शेतकऱ्यांना सुधारित वाण व आधुनिक लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
कृषी विज्ञान केंद्र , रोहा – रायगड आयोजित पिक प्रात्यक्षिकांमधे सुधागड – पाली तालुक्यातील 15 गावातील शेतकऱ्यांचा उत्तम सहभाग व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ , दापोली अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र , किल्ला – रोहा मार्फत विविध कृषि विस्तार उपक्रम राबविले जातात .
यामध्ये प्रामुख्याने कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांचे वाण प्रात्यक्षिकांतर्गत शेतक – यांच्या शेतावर लागवड केले जातात . या प्रात्यक्षिकांमधून पारंपारीक वाण व लागवड पध्दतीपेक्षा सुधारीत वाण व आधुनिक लागवड पध्दत यामधील फरक स्पष्ट करणे व उत्पादन वाढीसाठी शेतक – यांना उद्युक्त करणे हा प्रमुख उद्देश असतो . यामधे प्रयोगशील शेतकरी / महिला यांना सहभागी करून घेतले जाते व त्यानंतर त्यांच्यामार्फत या नवीन वाणांचा व पिक लागवड पध्दतीचा प्रसार केला जातो .
सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात कृषि विज्ञान केंद्रामार्फत भात , नाचणी , हळद , भुईमूग व तूर या पिकांच्या सुधारीत वाणांची प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत . यामधे सुधागड – पाली तालुक्यातील सुमारे १५ गावातील शेतक – यांना सहभागी करून घेण्यात आले आहे . भात पिकाच्या संकरीत भात सहयाद्री -४ ची लागवड आंबोले व करचुंडे येथीन शेतक – यांच्या शेतावर तर कर्जत – ९ जातीची प्रात्यक्षिके राबगाव , भालगांव , दिघेवाडी , नांदगाव या गावांतील शेतक – यांडे घेण्यात आली आहेत . गखे वाण असलेल्या रत्नागिरी -८ ची प्रात्यक्षिके शिळोशी गावात तर रत्नागिरी -६ या जातीची प्रात्यक्षिके पाली , शिळोशी , आपटव या गावात घेतली आहेत . नाचणीच्या दापोली -१ जातीची प्रात्यक्षिके राबगाव , व – हाड – जांभुळपाडा व दिधेवाडी येथे घेण्यात आली असून भुईमृग – कोकण भूरन व हळद – सेलम जातीची प्रात्यक्षिके राबगाव , रासळ , व – हाड – जांभुळपाडा येथील शेतक – यांकडे घेतली आहेत . महिला शेतक – यांना सामूहिक शेतीची आवड निर्माण होण्याकरीता राबगाव गावातील गजानन महिला बचत गटास सामूहिक भुईमूग व हळद लागवडीकरीता उद्युक्त करण्यात आले असून त्यांनी उत्तम प्रकारे लागवड केली आहे .
नुकतेच या प्रात्यक्षिकांची प्रत्यक्ष पाहणी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा . डॉ . प्रमोद मांडवकर , डॉ . राजेश मांजरेकर यांनी केली व शेतक – यांना मार्गदर्शन केले . यावेळी शेतकरी निवड करण्यात प्रमुख योगदान असलेल्या सुधागड तालुका कृषि मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री . शरद गोळे , ग्रामपंचायत सदस्य श्री . भास्कर दुर्गे , श्री . विराज लोंढे , श्री . मनोहर काळभोर , श्री . तानाजी खाडे यांनी सहभाग घेतला . या भेटी दरम्यान शास्त्रज्ञांनी सुधागड – पाली तालुक्यातील तहसिलदार श्री . दिलिप रायनवर यांचीही भेट घेवून शेतक – यांच्या उत्स्फुर्त सहभागाबद्दल माहिती दिली . या भेटी दरम्यान रब्बी – उन्हाळी हंगामातील प्रात्यक्षिकांचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली . ही भेटीचे आयोजन कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ . मनोज तलाठी यांचे मार्गदर्शनाखाली व सुधागड तालुका कृषि मित्र संघटनेच्या सहकार्याने यशस्वीपणे करण्यात आले .







Be First to Comment