सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे पगार सध्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (आर.डी.सी.सी) होत असतात. हे पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावेत याबाबत रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांनी सूचना केली आहे.
प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की आम्ही विनंतीपूर्वक सांगतो की आपल्या तालुक्यातील सर्व जि. प शिक्षकांचे वेतन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिक्षकांच्या खात्यावर अदा केले जाते. तथापि कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन हक्क व अधिकार संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनाच आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकार संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनाच असल्याचे नमूद केले आहे. तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारा नुसार नोकरी व वाणिज्य तथा आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने प्रदान केलेले आहेत.
या कारणाने आम्ही आपणास नम्रपणे विनंती करत आहोत की सध्याच्या संवेदनशील व अनिश्चित काळात शिक्षकांच्या आर्थिक लाभाच्या तथा कौटुंबिक हिताच्या दृष्टीकोनातून शिक्षकांचे वेतन त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेतूनच अदा करण्याची आम्ही विनंती करत असल्याचे राज्य शिक्षक समिती अध्यक्ष, राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष, राज्य प्रां. शिक्षक अध्यक्ष, राज्य केंद्र संघटना अध्यक्ष यांनी गटविकास रोहा, गट शिक्षणाधिकारी रोहा यांना दिले. हे निवेदन देण्यासाठी विनोद पाटील, खेमसिंग चव्हाण, अनिल नागोठकर, देवानंद पिंगळे, नारायण गायकर, रत्नाकर कानोजे, हेमंत गोयंजे, विज्ञान पाटील तसेच घुले आदींनी दिले.







Be First to Comment