Press "Enter" to skip to content

सावरोली – खारपाडा रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे चोहीकडे

रात्रीच्या वेळी अपघातांची समस्या गंभीर 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔷🔶🔷

 सावरोली खारपाडा या मार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांची समस्या गंभीर बनु शकते.मात्र यांचे कुणाला सोयर सुतक नाही.सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून ज्या कॉंट्रक्टर यांना या रस्त्याचे काम दिले होते मात्र त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या रस्त्यावरून पडलेल्या खड्यांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता प्रवासी वर्गंकडून वर्तविण्यात येत आहे. असे असुनही या रस्त्यावरील पडलेले खड्डे का ? भरले नाही असा  संतप्त सवाल या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे.

या मार्गावर मोठ्याप्रमाणावर कारखाने असल्यामुळे अवजड वहानांची मोठी रेलचेल असते त्यातच सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी छोटे – मोठे खड्डे पडल्याचे पहावयास मिळत आहे.मात्र रात्रीच्या वेळेस हे खड्डे निदर्शनास आले नसल्यामुळे वहान घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यातच गंभीर दुखापत होत असल्यांचे समोर येत आहे. 

गेल्या दोन वर्षा पुर्वी या रस्त्याचे काम झाले मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे येथिल प्रवासी वर्ग नाराजीचा सुर उमठत आहे.पडलेले खड्डे केव्हा भरणार असा सवाल या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे.जास्त करून हे खड्डे उडाणपुल च्या दोन्ही बाजूस तसेच रसत्याच्या मध्यभागी पडले आहे.मात्र पडलेले खड्डे लवकरात् – लवकर भरावे अशि मागणी प्रवासी वर्गांतून व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.