Press "Enter" to skip to content

खालापूरात घर कोसळून महिलेचा मृत्यू : वृद्धा गंभीर जखमी


सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶

मुसळधार पावसात तालुक्यातील बीङ खुर्द आदिवासीवाङीत बुधवारी राञी घर कोसळून गाढ झोपेत असलेल्या शंकुतला गोविंद वाघमारे (वय45) हिचा मृत्यू झाला तर तिची आई किसी बाबाजी पवार(वय75)जखमी झाली आहे.

कोसळलेल्या घराची पाहणी करताना आमदार थोरवे आणि तहसीलदार इरेश चप्पलवार.

घटनेची माहिती मिळताच  कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यानी घटनास्थळी भेट दिली.सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी संबंधित खात्याला पत्रव्यवहारातून पाठपुरवा करण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी तहसीलदाराना दिल्या.बुधवारी हवामान खात्याने दिलेला वादळाचा इशारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाने खालापूरकरांची झोप उङाली होती.

बीङखुर्द वाङीतील कच्च कूङामातीच आणि कौलारू घर मुसळधार पाऊसात तग धरू न शकल्याने दुर्घटना घङली.शासकिय मदत करण्याचे  आमदार थोरवे यानी आश्वासन बीङ खुर्द वाङीत भेट  दिल्यानंतर सांगितले.यावेळी त्यांच्या सोबत प्रशासकीय अधिकारी, खालापूर युवा सेना अधिकारी खालापूर महेश पाटील, विभाग प्रमुख नाना देशमुख,प्रशांत खांडेकर अन्य शिवसेना पदाधिकारी तसेच  उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.