Press "Enter" to skip to content

जासई हायस्कूलमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन व १५ ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिन उत्साहात सोशल डिस्टसिंगचे पालनककरुन साजरा करण्यात आला.

डॉ.कलाम यांच्या विषयीची माहिती कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितली विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपट व वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले.

यानिमित्त इ.५वी.व इ.८वी.चे विद्यार्थी स्काँलरशीपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत, धर्मदास घरत, जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत, योगिता म्हात्रे, पुजा कांबळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख सर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.