Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

भाजप किसान मोर्चाची तहसिलदारांकडे मागणी 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे कर्जत तालुक्यातील विवीध गावात भात पिकाचे खूप नुकसान झाले आहे, शेतकरी उभे पीक खराब झाल्याने हवालदिल झाला आहे, त्यांना पंचनामे करून त्यांना त्वरित मदत मिळावी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजप किसान मोर्चाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयात नायब तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, प्रदेश प्रदेश सचिव अशोक गायकर, जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मंदार मेहेंदळे, उद्योग आघाडी जिल्हा संयोजक शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, वसंत महाडिक, विनायक पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.