सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶
रोहा तालुक्यातील वरसगाव ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्राम संघाची स्थापना करण्यात आली.
सदर या सभेला रोहा पंचायत समिती सदस्य सिद्धी राजिवले,वरसगाव ग्रामपंचायत सरपंच विशाखा राजिवले, रोहा समितीचे प्रभाग समन्वयक राठोड, दमा मोकल, सी.आर.पी.जान्हवी महाडिक,रंजना राजिवले तसेच सर्व स्वयंसेवक सहायता समूहातील अध्यक्ष सचिव उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील अभियान व्यवस्थापक दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड, मोकळ यांनी ग्रामपंचायतीतील विविध योजनांविषयी माहिती दिली. अध्यक्ष,सचिव,खजिनदार,लिपिक,या पदांची नेमणूक ग्रामपंचायत ग्रामसंघात करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी महाडिक तर आभार राजेश्री राजिवले यांनी मानले







Be First to Comment