Press "Enter" to skip to content

लोहप येथिल स्मशानभूमीची दुरवस्था, लोखंडी पोल गेले  चोरीला

निवारा शेड नसल्यामुळे अत्यंसंस्कार करण्यासाठी आलेले नागरिकांची होते गैरसोय 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा  । 🔷🔶🔷

 मानवाच्या मृत्युं नंतर चे चिरस्थांन असलेली जागा म्हणजे स्मशान भूमी मात्र खालापूर तालुक्यातील लोहप गावानजीक असलेली आणी पाताळगंगा च्या तिरावर बांधलेली स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असलेले दृश्य पहावयास मिळत आहे.त्या ठिकाणी असलेले लोखंडी पोल चोरीला गेल्यांचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याच बरोबर त्या स्मशानभूमी चे शेड सुद्धा नसल्यामुळे अत्यंसंस्कार कसे करावे हा मोठा प्रश्न चिन्ह ग्रामस्थांच्या पुढे निर्माण झाला आहे.त्याच बरोबर निवारा शेड सुद्धा या ठिकाणी नसल्यामुळे सध्या ही स्मशानभूमी विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.

गेले काही वर्ष ह्या स्मशानभूमीची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे याकडे लक्ष्य देण्यासाठी कुणाकडे वेळच नसल्यामुळे  ग्रामस्थांच्या मध्ये नाराजीचा सुर उमठत आहे.त्याच बरोबर येथिल असलेले लोखंडी पोल चोरीला गेल्यामुळे आम्ही अंत्य संस्कार कसे करणार हा मोठा प्रश्न चिन्ह ग्रामस्थांच्या पुढे निर्माण झाला आहे.या ठिकाणी पाताळगंगा नदी समोरून वहात आहे.

तालुक्यातील असलेल्या स्मशानभूमी चांगल्या स्थितीत आहे.तर काही ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्यामुळे यामुळे ज्या स्मशान भुमीची झालेल्या दुरवस्था निर्माण झाली आहे. त्याकडे लक्ष्य देणे काळाची गरज असल्याचे मत या ठिकाणी उपस्थित असलेल्या या स्मशानभुमी दुरवस्थाच्या  संदर्भात येथिल ग्रामस्थ व्यक्त करीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.