Press "Enter" to skip to content

पुस्तकांच्या छापील किमतीपेक्षा जास्त किंमत घेत असल्याने मनसे आक्रमक

सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रतिनिधी । 🔷🔶🔷

पेण तालुक्यातील कारमेल स्कूल मध्ये पुस्तकावर असणाऱ्या छापील किमतीपेक्षा जास्त किंमत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेत असल्याचा प्रकार पालकांनी उघडकिस आणल्यानंतर पालकांनी पेण महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या रुपेश पाटील यांच्याकडे धाव घेतली.

रुपेश पाटील यांनी त्वरित 9 ऑगस्ट रोजी कारमेल स्कूलच्या व्यवस्थापनाला या तक्रारीबाबत निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर न मिळाल्याने रुपेश पाटील यांनी 14 सप्टेंबर रोजी पेण पंचायत समितीमध्ये देखील निवेदन दिले होते मात्र कारमेल स्कुलच्या व्यवस्थापकानी त्यांना सुध्दा केराची टोपली दाखविल्याने पेण मनसेने आपल्या कार्यकर्त्यांना सोबत कारमेलस्कूल वर धडक दिली.

यानंतर कारमेलस्कूलचे शिक्षक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊनही कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने येत्या दोन ते तीन दिवसात मनसेचा खळखट्याक दाखवू अशा इशारा मनसेचे रुपेश पाटील यांनी दिला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी कारमेल स्कूलच्या व्यवस्थापन तसेच शिक्षकांना याबाबत विचारले असता आम्हाला काहीही बोलायचे नाही असे सांगून हात वर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.