Press "Enter" to skip to content

जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांचे आवाहन

सण व उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरे न करता वैयक्तिक पातळीवर साजरा करा 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

जागतिक कोरोना महामारीने संपूर्ण जगाचा अभिलेख परिचित झाला असून या महामारीमुळे अनेकांचा संसार तसेच जीवन उध्वस्त झाले आहे. कोरोना रुग्ण संख्या ठराविक टप्प्यापर्यंत वाढते कमी होते व पुन्हा वाढते. आता कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असली तरी पुढे येणारा नवरात्रोत्सव, ईद ए मिलाद, दसरा, दिवाळी या सणांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते म्हणून या जागतिक महामारीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सण व उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरी न करता वैयक्तिक पातळीवर साजरा करा असे आवाहन रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी नागोठणे येथे केले.

आगामी नवरात्र उत्सव व ईद ए मिलाद व अन्य सणांच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती, मुस्लिम समाज बांधव व नवरात्रौत्सव मंडळ यांची संयुक्त बैठक नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिव गणेश सभागृहात घेण्यात आली त्यावेळी उपस्थित नागरिकांना सूचना करतांना गुंजाळ बोलत होते.

यावेळी रोहाचे पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, नागोठणे पो. नि. दादासाहेब घुटुकडे, सहाय्यक पो. नि. विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे, आरपीआय जेष्ठ नेते व्ही. के.जाधव, काँग्रेसचे जेष्ठ नेते निजामभाई सय्यद, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, असगर मुल्ला, शिवसेना उपविभाग प्रमुख संजय महाडिक, नागोठणे उपसरपंच सुरेश जैन, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, संचालक सिराजभाई पानसरे, सुनिल लाड, कोंडगाव सरपंच निखिल मढवी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य अकलाख पानसरे, पाटणसई ग्रामपंचायत सदस्य सचिन काळसकर, पप्पूशेठ अधिकारी, युसूफ पठाण, अशपाक सुमरा, प्रमोद गोळे, शेखर गोळे, चेतन कामथे आदींसह पोलिस पाटील व नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी शासकीय निर्देशांची माहिती देऊन सध्याच्या परिस्थितीत सण सणावर साजरे करताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या अशा सूचनाही यावेळी उपस्थित नागरिकांना गुंजाळ यांनी दिल्या. या बैैठकीसाठी पो.हे.काॅ. निलेश महाडिक व अन्य पोलिस कर्मचा-यांनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.