Press "Enter" to skip to content

जासई च्या शेतकऱ्यांचा सिडकोला आंदोलनाचा इशारा

पहिल्या मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा ! संघर्ष समितीचा नारा ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू । 🔶🔷🔶

जासई येथील शेतकऱ्यांचा सिडको विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी देत पहिल्या मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा असा नारा दिला.

जासई गावच्या २७० शेतकऱ्यांना सिडको कडून भूमी संपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ सर्व शेतकर्‍यांनी डेप्युटी कलेक्टर तथा भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित केले.

त्याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७० शेतकरी, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत, धर्माशेठ पाटील, सरपंच संतोष घरत, संजय ठाकूर, धर्मदास घरत, निलेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्वीचे प्रश्न,२२% भूखंडाची अजून पूर्तता झालेली नाही, एमटीएचएल करारानुसार नागरी सुविधांची पूर्तता झालेली नाही. गावातील राहत्या घरांचा प्रश्न, १३५ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले त्यांना प्रश्न, विस्तारित गावठाणाचा प्रश्न सुटलेला नाही हे सर्व प्रश्न सुटल्या शिवाय भूमी संपादन करु देणार नाही. अशी नाराजी व्यक्त केली व सिडको विरोधात शेतकऱ्यांनी उग्र असंतोष व्यक्त केला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.