पोलादपूर शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶
तालुक्यातील भुमिपुत्र आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवशी पोलादपूर शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन आनंदनगर येथे करण्यात आले. शहर भाजपाचे उपाध्यक्ष सचिन बुटाला यांच्या निवासस्थानी आनंदनगर येथील माजी सैनिक हनुमंतराव येरूणकर यांच्याहस्ते फित कापून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
याखेरिज, पोलादपूर तालुक्यातील पैठण, देवपूर, भोगाव, गांजवणे आणि कोंढवी येथील आदिवासीवाडयांमधील आदिवासी बंधूभगिनींना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई आणि कपडेवाटप करण्यात आले.
पोलादपूर शहर भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी उपाध्यक्ष मनोज भागवत, महिला अध्यक्ष उज्वला मराठे शेठ, नितीन घोसाळकर, महेश निकम, एकनाथ कासूर्डे, जयेश जगताप, समाधान शेठ, शहर उपाध्यक्ष सचिन बुटाला, अमित तलाठी, निलेश चिकणे, गणेश पाटणकर, भाई जगताप, पद्माकर मोरे, नवनाथ कासुर्डे, मनोज मोरे, परेश साबळे, राजेश कदम, पंकज बुटाला, नामदेव शिंदे, अर्चना शेठ, रश्मी दीक्षित, माई शिंदे, जान्हवी तलाठी, सपना बुटाला आदी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, देवपूर येथील पुणे स्थित उद्योजक अरविंद चव्हाण, भाजपा नेते राजू धुमाळ, राजेश कदम, विभाग अध्यक्ष परेश महाडिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पोहोचून सेवा सप्ताह साजरा करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जनतेसमोर जाण्याची संधी साधली आहे. पोलादपूर शहरात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना भाजप नेत्यांनी आगामी नगरपंचायत निवडणूक नजरेसमोर ठेऊन विद्यमान नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या परिवारामध्येच पदनियुत्क्या करून शिवसेनेला सूचक आव्हान दिले आहे. दुसरीकडे, नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी रजेवर गेले असून त्यांचा कार्यभार सांभाळणारे निवासी नायब तहसिलदार हेदेखील आजारी असल्याने कामकाज ठप्प आहे तर नगराध्यक्षपदाचा शेवटचा कालावधी असल्याने पुढील उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसलेले नगरसेवक कमाईच्या किंवा अन्यत्र संधी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले दिसून येत असल्याने भाजपाचे शहर पदाधिकारी त्यावर विशेष लक्ष ठेऊन असलेले दिसून येत आहेत.







Be First to Comment