किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना निवेदन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । भिवपुरी । गणेश मते । 🔶🔷🔶
पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळावी, एमएसपीनुसार शेतमाल खरेदी केला जावा, पीककर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी यासाठी बुधवारी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी, किसान युवा क्रांती संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष दिनेश ठाकरे, राहुल शिंदे उपस्थित होते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना विनाविलंब पीककर्ज वाटपबाबत वेळोवेळी आदेश देऊनदेखील बँका विविध अडचणी दाखवून पीककर्ज नाकारून अडचणीत आणत आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना विनाविलंब पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आपल्या परिसरातील बँकांना आदेश व्हावेत. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि व्यापारी सदर बाहेर असणाऱ्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एमएसपीपेक्षा फारच कमी दराने शेतमाल खरेदी करीत आहेत. याबाबत बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांना एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी सक्त आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील महिन्याभरापासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच, राहिलेल्या भातपिकाची कापणी सुरू झाली असून त्यासाठी भात खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी, नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.







Be First to Comment