Press "Enter" to skip to content

चौल आग्राव खड्डेमय रस्त्यासाठी ग्रामस्थांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

सुधारणा न झाल्यास राजीप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

रायगड जिल्हयातील अनेक मुख्य वाहतूक व रस्त्यांची भयावह दुरावस्था झाली आहे, रस्त्याच्या दुर्दशेमुळे प्रवाशी व वाहनचालक त्रासलेले आहेत. अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव खड्डेमय रस्त्यासाठी आज ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर डिसेंबरपर्यत रस्त्याचे काम पूर्ण करून देतो असे लेखी आश्वासन अधिकारी यांनी दिल्यानंतर चौलकरांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र डिसेंबर पर्यत रस्त्याचे काम न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौल आग्राव या तीन किलोमीटर रस्त्याचे काम 2019 साली मंजूर होऊन सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र कंपनीने रस्त्याचे कामच सुरू न केल्याने हा रस्ता खड्डेमयच राहिला होता. खड्डेमय रस्त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर 14 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थानी दिला  आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.