Press "Enter" to skip to content

आ महेंद्र थोरवे यांनी घेतला माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाचा आढावा

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶

राज्यापासून ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात थैमान घातलेल्या कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी योग्य नियोजनाची गरज होती म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे अभियान आज संपूर्ण महाराष्ट्र भर राबवले जात आहे.

कर्जत खालापूर मतदार संघात देखील या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य चौकशी व तपासणी केली जात आहे. त्यामुळे बहुतांश ही महामारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले जात आहे .

सदर अभियानाबद्दल आज आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ” माझे कटुंब माझी जबाबदारी ” अभियाना संदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या अभियानाचा सर्वाधिक लोकांना फायदा होईल , असा विश्वास यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी व्यक्त केला. सदर बैठकीत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी , सहाय्यक गटविकास अधिकारी राजपूत तसेच पंचायत समितीचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.