Press "Enter" to skip to content

पिक प्रात्यक्षिकांमध्ये सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

कृषी विज्ञान केंद्र रोहा तर्फे आयोजन 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶

ड्रॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधीनस्थ कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा मार्फत विविध उपक्रम राबविले जातात.यामध्ये प्रामुख्याने काही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांचे वाण प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केले जाते
या प्रात्यक्षिकांमधुन पारंपारीक वाण व लागवड पद्धती पेक्षा सुधारित वाण व अधुनिक लागवड पद्धत या मधिल फरक स्पष्ट करणे व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना उद्युक़्त करणे हा प्रमुख उद्देश असतो.यामध्ये प्रगतशील शेतकरी/ महिला यांना सहभागी करून घेतले जाते व त्यांच्या मार्फत या नवीन वाणांचा व पीक लागवड पद्धतीचा प्रसार केला जातो.

सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात कृषी केंद्रा मार्फत भात,नाचणी,हळद, भुईमूग,व तूर या पिकांच्या सुधारित वाणांचा प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत यामध्ये सुधागड-पाली तालुक्यातील सुमारे पंधरा गावातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले.भात पिकांच्या संकरित भात सह्याद्री-४ची लागवड आंबोले व करचूंडे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर कर्जत-९ जातीची प्रात्यक्षिके रबगाव,भालगाव, दिघेवाडी,नांदगाव या गावातील शेतकऱ्यांकडे घेण्यात आली.

गरवे वाण असलेल्या रत्नागिरी-८ ची प्रात्यक्षिके शिलोशी गावात तर रत्नागिरी -६ या जातीची प्रात्यक्षिके पाली, अपटवणे,शिलोशी या गावात घेतली आहेत नाचणीच्या दापोली-१ जातीचे प्रात्यक्षिके राबगाव,वऱ्हाड, जांभुळपाडा, दिघेवाडी येथे घेण्यात आली आहे. भुईमूग, कोकण रत्न व हळद शेलम जातीची प्रात्यक्षिके राबगाव,रासळ, वऱ्हाड,जांभुळपाडा येथील शेतकरी शेतकऱ्यांकडे घेण्यात आला.

महिला शेतकऱ्यांना सामूहिक शेतीची आवड निर्माण होण्याकरता राबगाव मधील गजानन बचत गटास हळद लागवड करणे उद्युक़्त करण्यात आले.त्यांनी उत्तम प्रकारे लागवड केलेली आहे नुकतीच या प्रात्यक्षिकांची प्रत्यक्ष पाहणी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.डॉ.प्रमोद मांडवकर,ड्रॉ. राजेश मांजरेकर यांनी केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सुधागड कृषी मित्र संघटनेचे अध्यक्ष शरद गोळे संस्थापक अध्यक्ष शशीभाऊ पाशिलकर, ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे,विराज लोंढे, मनोहर कालभोर,तानाजी खाडे,सोमनाथ जंगम,दत्ताराम गायकवाड,यांच्यासह असंख्य महिला वर्गानेही सहभाग घेतला.

नंतर या शास्त्रज्ञांनी सुधागड तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायनवर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या उस्फुर्त सहकार्याची माहिती देऊन रब्बी हंगामातील प्रात्यक्षिकांचे नियोजना बद्दल चर्चा करण्यात आली. वरील कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉक्टर मनोज तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी मित्र संघटनेच्या सहकार्याने यशस्वीपणे करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.