Press "Enter" to skip to content

नवीन पनवेल उड्डाणपुलाचे खड्डे भरले

नवीन पनवेल उड्डाणपुलाचे खड्डे भरले

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झाले काम

सिटी बेल लाईव्ह/ नवीन पनवेल.

पनवेल आणि नवीन पनवेल यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते.पुलाच्या दोन्ही टोकांना वाहतुकीची कोंडी होत होती.वाहन चालकांना खड्डे चुकवत मार्ग काढताना नाकी नऊ येत होते.माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडको कडे पाठपुरावा करत हे खड्डे तातडीने भरण्यांस सांगितले होते.मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर च्या मध्यरात्री हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संदीप पाटील यांचे आभार मानले आहेत.
नवीन पनवेल पलीकडील सुकापुर ते धोदानी तसेच रिटघर,मोरबे ते थेट चींध्रण मार्गे औद्योगिक वसाहत या पट्ट्यात झपाट्याने विकास होत आहे.नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प आकार घेत आहेत.अर्थातच नवीन पनवेल उड्डाणपूल पासून त्यांच्या प्रवासाची सुरुवात होते.वाहतुकीचा राबता असल्याने पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते.संदीप पाटील यांनी सांगितले की काही खड्ड्यातून तर अतील लोखंडी सळई दिसू लागल्या होत्या.ते पुढे म्हणाले की आज माझ्या मागणीची दखल घेत खड्डे बुजवले असले तरीही ही तात्पुरती डागडुजी आहे वास्तविक या पुलावरून जाणाऱ्या रहदारीचे प्रमाण पाहता या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.