आदिवासी विकास विभाग व आयसिडीएस विभागाचे विशेष सहकार्य 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
कर्जत तालूक्यातील कूपोषण प्रश्नांची तीव्रता कमी करण्याच्या उदेशाने शासनाच्या आदिवासी विकास विभाग व एकात्मीक बालविकास विभागाचे विशेष सहकार्याने दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्यूट्रिशन -कँन प्रकल्पाच्या वतीने तालूक्यातील 40 दूर्गम आदिवासी वाड्या मध्ये कूपोषण विरोधी जनजागृती मोहीम राबवीली जात असून दि. 12 ऑक्टोबर रोजी सूरू झालेली ही मोहीम 25 ऑक्टोबर पर्यत राबवीली जाणार आहे.

अनियमीत व सकस आहाराचा आभाव, बालविवाह, दोन मूला मधील अतंर, गरोदर पणातील विशेष आरोग्य तपासण्या, गरोदर पणातील आहार, नवजात शिशुची आरोग्य व पोषणाची योग्य पध्दती या बाबत वाडी वस्तीवर कार्यकर्तै, आशा वर्कर, आगंणवाडी सेवीका यांच्या मदतीने जनजागृती करत आहेत.
कर्जत तालुक्यातील आदिवासी उपाययोजनेतील 40 अगंणवाड्या मधून शासनाची महत्त्वकाक्षी अशी भारतरत्न डाँ.एपीजे अब्दुल कलाम अम्रत आहार योजना राबवीली जाते, या योजने बाबत सुध्दा पोष्टर आणी बँनर द्वारे लाभार्थ्यांना माहीती दिली जात आहे.

सध्याच्या कोरोना सकर्माच्या बाबतीत सरकार ने दिलेल्या सूचनांचे पालन करत ही मोहीम राबवीली जात आहे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मूख्यकार्यकारी आधिकारी डाँ. किरण पाटील, एकात्मीक आदिवासी विकास विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प आधिकारी शशीकला आहिरराव, उपमुख्यकार्यकारी आधिकारी नितीन मंडलीक, कर्जतचे गटविकास आधिकारी बालाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली व बालविकास प्रकल्प आधिकारी निशीगंधा भवाळ, अनिकेत पालकर यांच्या सह दिशाचे कार्यकर्ते अशोक जंगले,रवी भोई, विमल देशमूख, शांताराम निरगूडा, जयराम पारधी, संतोष देशमूख, अंगणवाडी पर्यवेक्षिका शरयू तांबे, हळनकर, आदी चा प्रत्यक्ष सहभाग या मोहीमेत आहे, 40 गावातील अंगणवाडी सेवीका,आशा वर्कर, मदतनीस, गाव कार्यकर्त्या या मोहीमेत सहभागी आहेत.







Be First to Comment