Press "Enter" to skip to content

बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांचे पद तूर्तास अबाधित

कहानी में ट्विस्ट : कारवाई चा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶

मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ जणांनी टाकलेला अविश्वास ठराव मंजूर होऊन सुद्धा नौशास दळवी यांचे सरपंचपद हे आजतागात अबाधित राहिले आहे.

सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधात अविश्वास ठराव हा 7 ऑक्टोबर 2020 रोजी सादर करण्यात आले होते.या संदर्भात तहसीलदार गमन गावित यांनी दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी सदस्यांची विशेषसभा लावली होती..
तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले आहे की, सभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच सहित नऊ सदस्यांनी मतदान केल्याने सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला मात्र नौशाद दळवी यांचे सरपंचपद हे अद्याप पर्यंत गेले नाही. कारण ते जनतेतून निवडून आल्यामुळे आम्हाला पद रिक्त करण्याचा अधिकार नाही . मी माझ्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेतली आहे. या सभेबाबत अहवाल हा जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आहे.जो पर्यंत वरिष्ठ कार्यलयाकडून निकाल येईपर्यंत सरपंच नौशाद दळवी हेच राहणार आहे असे असे सुद्धा गावित यांनी सांगितले.त्यामुळे आता विरोधकांना निर्णय येईपर्यंत वाट पहात बसावे लागणार आहे.

सरपंच नौशाद दळवी यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळात त्यांनी सांगितले की,ग्रामपंचायत मध्ये माझ्या कारकिर्दीत जी कामे झाली आहेत ती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन केली आहे.मासिक सभेमध्ये झालेले ठराव यांची अंमलबजावणी नियमाप्रमाणे केली आहे.विरोधक यांनी आमच्याच जोरावर निवडून आलेला सदस्य यांनी आमच्याशी गद्दारी केली नसती तर ही नामुष्की आली नसती.एक वेळ विरोधक यांचे कामच आहे विरोध करण्याचे त्यांच्याकडून विरोध होण्याची अपेक्षा आहे. मात्र घरका भेदी लंका भेदी सोबत नको असे शेवटी त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.