Press "Enter" to skip to content

आज उरणमध्ये ८ कोरोना पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ८ जण सापडले आहेत. आज उपचार करून २ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह १९७७, उपचार करून बरे झालेले १७५९, उपचार घेणारे ११६, मयत १०२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज जासई १, खोपटे १, द्रोणागिरी १, तुनीर नेव्हल स्टेशन करंजा २, गणेश नगर करंजा १, चिरनेर १ असे एकूण ८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर चिरनेर १ व भवरा १ असे २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत झालेले नाही.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यातरी कमी झाल्याचे जाणवत असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.