Press "Enter" to skip to content

शासन-प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे खालापूरातील आदिवासी समाज मूलभूत गरजांपासून वंचित

दलित युथ पँथरचा जाहीर निषेध ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔷🔶

आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात जग चंद्रावर जाण्याच्या गप्पा मारत असताना याच धरतीवर आदिवासी बांधवांना जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागते , ही शरमेची बाब आहे . चार बुक शिकून पाच आकडी पगार घेणारे बुजगावणे सरकारी बाबू कागदोपत्री विकास साधत असताना प्रत्यक्षात मात्र समस्या ” जैसे थे ” पहाण्यास मिळत आहेत . मग हा आदिवासी समाजातील वाड्यांवरचा निधी जातो कुठे ? असा संतापजनक सवाल घेत दलित युथ पँथरचे कार्यकर्ते कडाडले असून शासन प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध करत तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे .

याबाबतीत त्यांनी आज खालापुर पोलिस स्टेशन, खालापुर पंचायत समिती तसेच खालापुर तहसील कार्यालय येथे निवेदन सादर केले आहे . खालापुर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिवासी वाड्यांपैकी पिरकरवाडी , अरकसवाडी , उंबरणेवाडी , नवीवाडी , या चार आदिवासी वाड्यांमध्ये आजपर्यंत पिढ्यानपिढ्या कुठल्याही प्रकारच्या मूलभूत गरजा पोहचल्या नाहीत .वीजपुरवठा , रस्ते , आरोग्यसेवा , शिक्षण , मोबाईल सेवा त्याचप्रमाणे अनेक सुविधा पोहचल्या नसल्याने आदिवासी बांधवांना दोन पिढया हा त्रास सहन करावा लागत आहे.

शासन – प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा हा कहरच म्हणावा लागेल . आधुनिक आणि तंत्रज्ञान युगातील घडामोडीत या आदिवासी वाड्या कोसो दूर असून हे जीवन जगताना त्यांनी वेळोवेळी ह्या समस्यांचा पाढा शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांकडे मांडूनही या वाड्यांकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे . आरोग्य सेवा १५ ते २० किलोमीटर दूर असल्याने अनेकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे , तर विजेअभावी आम्ही कसे दिवस काढत असू , यावर त्यांनी संताप व्यक्त केला .

खालापूर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील या चार आदिवासी वाडीतील बांधवांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी दलित युथ पँथर च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले तर दलित युथ पँथरचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण रोकडे यांनी खालापूर तहसीलदार यांना सांगितले की , जर आम्हाला आठ दिवसांत सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आपल्या नाकर्तेपणाच्या भूमिकेविरोधात आम्ही तीव्र आदोलंन छेडु , असा ईशारा दलित युथ पँथर च्या माध्यमातून देण्यात आला .तर आदिवासी बांधवांना सोई सवलती – मूलभूत गरजा न पुरवणाऱ्या बुजगावन्या शासकीय अधिका-यांची त्वरित हकालपट्टी करा अशी मागणी प्रवीण भाई रोकडे यांनी केली आहे .

यावेळी दलित युथ पँथरचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण भाई रोकडे ,
संदेश कांबळे – खालापुर तालुका अध्यक्ष , रोशन मोरे – खालापूर तालुका उपाध्यक्ष , खालापुर तालुका युवा उपाध्यक्ष – सागर केदारी , नागेश कांबळे मनोज मुखणे खालापुर व कर्जत तालुका कार्यकरणी, पँथर सुशिल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.