Press "Enter" to skip to content

दार उघड उद्धवा, दार उघड ! मंदिराचे दार उघड !

पालीत भारतीय जनता पार्टी चे आंदोलन 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । विनोद भोईर । राबगाव/पाली । 🔷🔶🔷

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरं, धार्मिक स्थळं बंद आहेत. राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी आज भाजपचं राज्यभरात आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी च्या वतीने पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात मंगळावर (१३) सकाळी 11 वाजल्या पासून एकदिवसीय आंदोलनाला सुरुवात झाली.

त्यावेळी संगीत भजन, तसेच दार उघड उद्धवा दार उघड ! मंदिराचे दार उघड अश्या घोषणा देत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला.

मीशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र महाराष्ट्र राज्यात अद्यापही मंदिरं अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, मिलिंद पाटील सरचिटणीस दक्षिण रायगड भाजपा , अमरदीप काशिनाथ म्हात्रे रोहा तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष , योगेश मधुकर जाधव रायगड जिल्हा संयोजक वाहतूक सेल, यशवंत आठवले, वासुदेव मोरेश्वर कानडे सुहास चिंतामणी आपटे, प्रमोद जगन्नाथ पावगी, शिवाजी मनोहर दिवकर, सागर अनंत मोरे, प्रकाश गजानन जोगलेकर ,अशोक यशवंत जाधव,सुचित्रा सावरगावकर जिल्हा महिला उपाध्यक्ष ,अश्विनी यादव महिला रायगड जिल्हा उपाध्यक्ष, आरती अजय भातखंडे सुधागड तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष, वैशाली राजेश मपारा अरुणा साठे, विजया गद्रे,जयश्री पोंगडे, महिला अध्यक्षा आरती भातखंडे तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर , बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष धनंजय धारप, वासू मराठे, राज्य सरकार मॉल्स, दारुची दुकानं उघडू शकतं मग मंदिरं का उघडली जात नाहीत, पुजारी, मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांचा राज्य सरकारने विचार केला आहे का, असा सवाल भारतीय जनता पार्टी चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.