सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔷🔶
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूमुळे लोकजनशक्ती पार्टींला मोठा धक्का बसला आहे.रसायनी येथील सम्यक सामाजिक संस्थेच्यावतीने रिस येथील कार्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक प्रकाश गायकवाड यांच्याहस्ते स्वर्गींय केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर सम्यक सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या जीवनचरीत्रावर माहिती सांगितली.सन 1996 पासून ते प्रत्येक केद्रं सरकारमध्ये मंत्री राहिले.गेल्या पाच दशकांमध्ये ते आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिले.1977 च्या लोकसभा निवडणुकीत हाजीपुर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणा-या पासवान यांनी चार लाखांहून अधिक मत मिळवून जागतिक विक्रम केला.त्यानंतर सन 2014 पर्यंत त्यांनी आठ सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या.सहा पंतप्रधानांसोबत काम करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.







Be First to Comment