Press "Enter" to skip to content

सुधागड रा.काँ.युवक अध्यक्षपदी संदेश शेवाळे यांची फेरनिवड

खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व प्रसिद्ध युवा उद्योजक संदेश शेवाळे यांच्यावर  पुन्हा  एकदा सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकअध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.  पालीतील कार्यकारणी बैठकीत खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते शेवाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आ.अनिकेत तटकरे व  पेण सुधागड रोहा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा यांच्या सूचनेनुसार सदर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या फेरनिवडीने तरुणांमध्ये  उत्साह संचारला आहे.

तरुण , तडफदार, कार्यकुशल युवा नेतृत्व असलेल्या संदेश शेवाळे यांच्या हाती युवकअध्यक्षपदाची धुरा मिळाल्याने सुधागड तालुक्यात रा.काँ. पक्षाला नवी उभारी व बळकटी मिळाली आहे. सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कलाक्रीडा आदींसह सेवाभावी  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुधागड तालुका युवक अध्यक्षपदावरून संदेश शेवाळे यांनी जनतेचे विविध प्रश्न व समस्या  मार्गी लावण्याचे काम केले आहे. अधिकाधिक युवक युवतींना पक्षात सामावून घेण्याची त्यांची सतत धडपड सुरू असते.संदेश शेवाळे यांची युवकांमध्ये क्रेझ असून ग्रामीण व शहरी भागासह खेड्यापाड्यात, आदिवासीवाड्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. एक होतकरू प्रभावी तरुण उद्योजक व कुशल राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटना वाढावी याकरिता सतत व प्रामाणिकपणे झटणारे  सक्षम व धडाकेबाज युवा नेतृत्व असलेले संदेश शेवाळे युवकाध्यक्षपदाची जबाबदारी भविष्यात देखील कणखरपणे सांभाळतील व पक्ष संघटना मजबूत करतील असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला. संदेश शेवाळे यांनी पदभार स्वीकारत वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली युवकाध्यक्ष पदाची जबाबदारी आपण कर्तव्येतत्परतेने पार पाडू तसेच येत्या काळात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल असे स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल,  जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा महिलाध्यक्षा गीताताई पालरेचा, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे,पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते. संदेश शेवाळे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.