सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
कोव्हीड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रधान करण्यासाठी आवश्यकता आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पंतप्रधान स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेपर्यंत शहरातील पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल 10 हजार कर्ज स्वरूपात बँकेकडून उपलब्ध केले जात आहे.
प्रारंभी आज नगरपरिषदेच्या माध्यमातून 9 पथविक्रेत्या लाभार्थींना कर्ज मंजूर झाल्याचे पत्र वाटप करण्यात आले. सदर योजना दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरांमध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू असून पथविक्रेते एक वर्षाच्या परत फेड मुदतीसह 10 हजार पर्यंत खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर अर्ज हे विनातारण असेल आणि विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड करणारे फळविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील.

सदर कर्जावर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहतील. पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास 7 % टक्के व्याज अनुदान मिळण्यास प्राप्त होईल. आणि सदर व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात तिमाही प्रमाणे जमा होईल. तसेच सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहार करणाऱ्यासविक्रत्यांना 1200 रुपये कॅशबॅकची सुविधा देण्यात येणार आहे.
अश्या योजनेसाठी नगरपरिषद हद्दीतील 200 पथविक्रेत्यांनी अर्ज दाखल केले होते. सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेल्या 135 अर्ज नगरपरिषदेच्या मार्फत पथविक्रत्यांची खाते असलेल्या त्या- त्या बँकेत मंजुरी साठी पाठवण्यात आले. प्रारंभी 9 पथविक्रत्यांची कर्ज मंजूर झाली. त्या पथविक्रत्यांना आज दि.13 ऑक्टोबर रोजी कर्ज मंजूर झाल्याचे पत्र मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी उपस्थित होत्या. सुरुवातीस नगरपरिषद लेखनिक ऋषिता शिंदे यांनी या योजनेची माहिती दिली.200 अर्ज पैकी सर्व कागदपत्रे पूर्ण असलेली 135 प्रकरणे बँकेकडे पाठविण्यात आली होती .त्यापैकी 9 प्रकरणे मंजूर झाल्याचे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कोरोना महामारीत 10 हजार रक्कम कमी नाही, शासनाच्या योजनेचा फायदा घ्या, ज्यांनी अर्ज केले नसतील त्यांनी अर्ज करा असे आवाहन यावेळी केले.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी कर्ज स्वरूपात भांडवल मिळाले आहे त्याचा फायदा करा आणि या योजनेचा लाभ घ्या असे आवाहन केले.







Be First to Comment