राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्याची उरण तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶
उरण तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने प्राथमिक शिक्षकांचे पगार वेतन खात्याचे फायदे देणाऱ्या बँकेत व्हावेत अशी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
सदर भेटीत वेतन खात्याच्या विविध सुविधांमुळे शिक्षकाला आर्थिक फायदे व प्रसंगी कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल याबाबत सांगण्यात आले. काही बंधू भगिनींच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रसंगाला व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जर आज वेतन खाते अश्या बँकेत असते तर त्या शिक्षकाच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असता.
त्यामुळे 1) वित्त विभाग,शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१४१/कोषा-प्रशा-५,दि.८/१०/२०२०, 2) वित्त विभाग,शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५१/२०.कोषा प्रशा-५,दि.१३/३/२०२०, ३) भारतीय राज्यघटनेचे कलम २१ व्यक्तिस्वातंत्र,कलम१९ (१)(ग) व्यापार,नोकरी,व्यवसाय तसेच वाणिज्य स्वातंत्र , ४) सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा रायगड यांची सूचनां यान्वये प्राथमिक शिक्षकांना त्याना हव्या त्या बँकेत वेतन खाते काढणार आहेत. त्या खात्यात आपण त्यांचे पगार जमा करावेत.अशी भूमिका समन्वय समितीने मांडली.
समन्वय समितीची हि भूमिका दोन्ही मान्यवरांनी मान्य करीत असे म्हटले कि,’’तो शिक्षकांचा शासनाने दिलेला हक्क आहे. जे शिक्षक अशी वैयक्तिक मागणी करून अर्ज करतील त्यांचे पगार त्या बंकेत जमा केले जातील.
यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना आवाहन करण्यात येते आपल्याला हव्या त्या बँकेत खाते काढावे. त्या पासबुकाची झेरॉक्स व सोबत पाठवत असलेले अर्ज भरून कार्यालयात द्यावेत.
समन्वय समितीच्या काही सूचना: जास्त फायदा यापेक्षा सुरक्षित व पारदर्शक व्यवहार असणारी बँक निवडावी, शक्यतो बँक ऑफ़ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्यापैकी बँक निवडावी.जास्त बँक तालुक्याला पगार करताना अडचणीच्या ठरू नये म्हणून, खाते काढले असल्यास नवीन खाते काढू नये.या खात्यावर एक पगार जमा झाला कि ते बँकेत अर्ज देवून वेतन खाते करता येते. केंद्रातील सर्व शिक्षकांची एकच बँक असेल तर अजून सुसूत्रता येईल.
यावेळी शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, बबन पाटील, दोंदे संघटनेचे संजय केणी, शिक्षक संघाचे हेमंत गावंड, महेंद्र गावंड, महेश गावंड, रंजना केणी, यशवंत पाटील, अंकुश पाटील, राजा पाटील, उपेंद्र ठाकूर, नरेश म्हात्रे, अजित जोशी, दिलीप म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, गोपाळ घरत, प्रल्हाद नवाले आदी उपस्थित होते.







Be First to Comment