Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीत तरुणांची मजबूत फळी निर्माण करणार – पप्पूशेठ अधिकारी

पक्षात पुन्हा सक्रिय होण्याचा 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

माझ्या व्यवसायिक कारणास्तव मी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामात सक्रिय राहू शकलो नाही. आता अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नाजिमभाई असवारे यांच्या आदेशानुसार रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे व आम्हां तरुण कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पक्षात सक्रिय होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांची मजबूत फळी निर्माण करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष पप्पूशेठ अधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या वेळी व्यक्त केला.

यावेळी अलिम मांडलेकर, राजू कुरेशी, कादिर रिफाई, फजल अधिकारी, फैज अधिकारी, अजीम कुवारे, असिफ कुदेकर, नसीम इलामी, इकबाल शिंदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पप्पूशेठ अधिकारी म्हणाले की, काही काळ मी पक्षाच्या कामात जास्त वेळ देऊ शकलो नाही. परंतु समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला राजकारणाची जोड असावी लागते असा सल्ला अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नाजिमभाई असवारे यांनी मला दिला. त्यामुळे मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचे ठरविले आहे. यापुढे पुन्हा पक्षाचे जोमाने काम करीन तसेच विभागातील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मित्रांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीन. असे शेवटी पप्पूशेठ अधिकारी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान पप्पूशेठ अधिकारी हे नागोठणे मोहल्ल्यातील युवा नेतृत्व असून त्यांचा मनमिळाऊ व प्रेमळ स्वभाव तसेच सर्वांना आपल्या परीने मदत करण्याची त्यांची तळमळ पाहून आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीस त्यांना हातभार लावू असे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.