सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह अवघे २ जण सापडले आहेत. आज उपचार करून १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर १ चा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १९६९, उपचार करून बरे झालेले १७५७, उपचार घेणारे ११०, मयत १०२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज ओमकार कॉलनी कुंभारवाडा २ जणच कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. समाजमंदिर १, खोपटे १, चिरनेर २, बोरी ३, आवरे १, फुंडे १, पोलीस लाईन १, म्हातवली स्टार कॉंप्लेक्स ४, उरण बाजारपेठ १, बोकडविरा २ असे एकूण १७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर जेएनपीटी टाऊनशीप येथील १ चा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये गेले २ ते ३ दिवसांपासून कोरोनाची आकडेवारी अत्यंत कमी होत आहे. तसेच उपचार करून घरी सोडण्यात येणाऱ्यांची आकडेवारी जास्त आहे. तर मयताचा आकडाही कमी येत आहे. त्यामुळे उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसून येत आहे. अशीच आकडेवारी राहिली तर कोरोनावर मात करणे सहज शक्य होईल असा विश्वास वाटत आहे.








Be First to Comment