विशेष फेस्टिवल ऍडव्हान्स स्किम’ची घोषणा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठे गिफ्ट दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पत्रकार परिषदेत ‘विशेष फेस्टिवल ऍडव्हान्स स्किम’ची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही स्पेशल एलटीसी सुरु केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी LTA कॅश व्हाउचर स्कीम आणि स्पेशल फेस्टिव्हल ऍडव्हान्स स्कीम अशा दोन स्कीमची घोषणा केली आहे.
– या योजनेचा सर्व केंद्रीय कर्मचारी लाभ घेऊ शकतात. यासह राज्य सरकारचेही कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला हे प्रस्ताव मान्य करावे लागतील.
– या योजनेचा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना रूपे प्रीपेड कार्ड मिळेल.हे कार्ड रिचार्ज करावे लागले.
त्यानंतर यात१० हजार रुपये जमा होतील. यासाठी लागणारे बॅंक शुल्क सरकार भरेल.
– या योजनेत कर्मचार्यांना एलटीएच्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे. परंतु, या व्हाउचरचा वापर ३१ मार्च २०२१च्या आधी करावा लागणार आहे.
– याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी घेतल्यास लाभ मिळणार आहे.
– ऍडव्हान्समध्ये घेतलेली रक्कम कर्मचाऱ्यांना १० महिन्यांमध्ये परत करता येईल. म्हणजेच महिन्याचा हजार रुपये हप्ता भरावा लागेल.
या योजनेमध्ये एकूण ८ हजार कोटींची ग्राहक मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.






Be First to Comment