Press "Enter" to skip to content

उरण तालुक्याला आधारकार्ड केंद्र सुरू
करण्याची पत्रकार संघाची मागणी


सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔶🔷🔶

केंद्र व राज्य सरकारने भारतीय नागरिकत्वाचा प्रमुख पुरावा म्हणून आधारकार्ड समजला जात आहे. परंतु आधारकार्ड बनविण्यासाठी उरण तालुक्यात फक्त एकच केंद्र कार्यरत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेला अनेक हेलपाटे मारावे लागत आहे. तरी ही अडचण लक्षात घेऊन तालुक्यात इतर ठिकाणी आधारकार्ड केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत अशी मागणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

आजच्या काळात, आधार कार्ड अनेक मार्गांनी प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनला आहे. शाळांमधील मुलांच्या प्रवेशापासून ते अनेक सरकारी योजनांसाठी आधार कार्ड मागितले जातात. याशिवाय ओळखपत्रांसाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे आधारकार्ड बनविण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या आधाकेंद्रात जाऊन आधारकार्ड बनवावे लागते.
मात्र उरण तालुक्याला शासनाने एकमेव असे आधारकेंद्र जेएनपीटी
टाऊनशीप येथे सुरू आहे.

या ठिकाणी तालुक्यातील नागरिक आधारकार्ड बनविण्यासाठी येत असतात. त्यामुळे सदर केंद्रावर गर्दी होऊन वातावरण तंग बनते. काहीवेळा आधारकार्ड बनविताना असलेल्या रांगेत अनेकवेळा बोलाचाली होत असल्याचे समजते. तसेच आधारकार्ड बनविण्यासाठी दिल्या नंतर तो बनवून कधी मिळेल याचा नेम नाही. यामुळे उरणच्या जनतेची आर्थिक कुचंबणा मोठ्या प्रमाणात होत आहे.

तालुक्याला एकमेव आधारकेंद्र असल्याने त्याच्यावरही आर्थिक ताण पडत आहे. तरी शासनाने याचा सारासार विचार करून उरणच्या जनतेची होणारी अडचण लक्षात घेऊन तालुक्यात इतर अनेक ठिकाणी आधारकार्ड केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.