Press "Enter" to skip to content

मूळवासीय संघटनेचे उपाध्यक्ष संतोष आखाडे राजीनाम्याच्या पावित्र्यात !

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔷🔶

माथेरान मध्ये २००९ साली मूळवासीय अश्वपाल संस्थेची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली आहे.या संस्थेतील पदाधिकारी आपल्या परीने संस्थेच्या माध्यमातून कामे करीत असतात. पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यातच नेहमीच माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर जी काही पर्यटकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये आमच्या संस्थेच्या बाबतीत सर्वत्र उदासीनता दिसून येते.

याबाबतीत संस्थेच्या बैठकीत नियमित होणाऱ्या निर्णयांची सदस्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही.वारंवार सांगून देखील काही सदस्यांच्या उर्मट भाषेमुळे सुद्धा संस्थेचे नाव खुप पिछाडीवर पडत आहे. त्यामुळे माथेरान मधील नागरिकांसह पर्यटकांमधून एक वेगळाच संदेश जात आहे. सर्वांचेच जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते याचे भान आमच्या काही सदस्यांना नसल्याने आणि याबाबत त्यांना काहीच गांभीर्य नसते त्यामुळे मूळवासीय संघटनेचे उपाध्यक्ष संतोष आखाडे राजीनाम्याच्या पावित्र्यात असून मागील काळात सुध्दा त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. तो त्यावेळेस स्वीकारला नव्हता. परंतु एक सामाजिक बांधिलकी आणि या गावाचे पर्यटन कायमस्वरूपी अबाधित राहावे.आपण संस्थेत महत्वाच्या पदावर असताना केवळ सदस्यांकडून होत असलेल्या नेहमीच्या चुकांमुळे आपले नाव देखील मागे पडत आहे.

संघटनेचा मग तो गावातील कोणत्याही अश्व संघटनेचा जेष्ठ सभासद असो ती व्यक्ती मयत झाल्यास त्यांना श्रद्धांजली म्हणून काही तास आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय संघटने मार्फत झाला तर आमच्या संघटनेचे सदस्य त्यास दुजोरा देत नसून मनमानी करतात त्यामुळे आपण स्वतः या जबाबदारी मधून स्वतंत्र झालेले अधिक उत्तम आहे या जाणिवेतून आपण लवकरच आपला राजीनामा अध्यक्षांकडे देणार आहोत असेही संतोष आखाडे यांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.