सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नौशाद रज्जाक दळवी यांच्याविरोधात उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ सद्स्यांनी टाकलेला अविश्वास ठराव नऊ विरुद्ध तीन मतांनी विशेष सभेत मंजूर करण्यात आला.
यासभेचे पिठासीन अधिकारी तथा मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधात अविश्वास ठराव हा 7 ऑक्टोबर 2020 रोजी सादर करण्यात आले होते.
सदर सभेत अविश्वास ठराव का टाकण्यात आला आहे त्याबाबत ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन यांनी सांगितले की सरपंच हे ग्रामपंचायत सदस्य याना विश्वासात घेत नाही. विकासकामे वेळेवर न करणे,त्याकडे दुर्लक्ष करणे,शासनाकडून आलेला निधी खर्च न करणे,सरपंच यांचा मनमानी कारभार,मासिक सभेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,आदी मुद्दे नमूद केले.
तर सरपंच नौशाद दळवी यांनी हे सर्व आरोप फेटाळात त्यांनी सांगितले की,ग्रामपंचायत मध्ये माझ्या कारकिर्दीत जी कामे झाली आहेत ती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन केली आहे.मासिक सभेमध्ये झालेले ठराव यांची अंमलबजावणी नियमाप्रमाणे केली आहे.
सदर सभेत सरपंच नौशाद दळवी, सदस्या जगीता कोटकर, नम्रता शिंदे यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली तर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ सदस्यांनी हात उंच करून मतदान करण्याची मागणी केली .
हात उंच करून मतदान मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने हात उंच करून मतदान घेण्यात आले.यावेळी अविश्वास ठराव विरोधात सरपंच नौशाद दळवी,जगीता कोटकर, नम्रता शिंदे यांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच मतीन सौदागर,ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन,सचिन जंगम,भारती बंदरी,प्रणिता कोपरदर,वैशाली वाघमारे,संगीता वाघमारे,लता वाघमारे,गणेश कट यांनी मतदान केले.
मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सहित सर्व सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम1959चे कलम 35(3) नव्ये 3/4प्रमाणे बहुमताने ठराव सभेत घेणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात नऊ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने बहुमत सिद्ध झाल्याचे चे पिठासीन अधिकारी तथा मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी जाहीर केले.







Be First to Comment