पार पडली कोरोना योध्यांची भुमीका : लहान-मोठयांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । विनोद भोईर । पाली । 🔶🔷🔶
शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या आवाहनानुसार कोरोना संकटकाळात माझे योगदान अंतर्गत दि.11/10/2020 रोजी सौ इंदिरा सांस्कृतिक भवन गुजराती समाज हॉल मधली आळी पाली येथे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
अलिबाग शासकिय रक्तपेढी रक्ताचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले होते.अशावेळी पालीतील 70 जागरूक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक महत्वपूर्ण कोविड युद्धाची भूमिका पार पाडली.
रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला गुजराती समाज हॉलचे अध्यक्ष अशोक मेहता यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कमलाकर शिंदे,मोरेश्वर कांबळे,अनिल राणे,संघर्ष समितीचे प्रदीप गोळे,शिवऋण प्रतिष्ठानचे केतन मस्के,सुलतान बेणसेकर व पालीतील सर्व सामाजिक चळवळीत काम करणारे सुजाण नागरिक आवर्जून उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षक कुणाल पवार,विकास चित्ते,शिक्षक भारती संघटनेचे राज्य प्रवक्ते सतीश हुले,सर्व शिक्षक वर्ग व सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

रक्तदान शिबिरात मलाही रक्तदान करायचे होते.पण अचानक बाहेरगावी जावे लागल्याने मला ह्या समाजपयोगी कार्यक्रमाला मुकावे लागले.याची खंत आहे.पण कुणाल पवार व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय नियोजनबद्ध व सुरेख पद्धतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
दिलीप रायण्णावार, तहसिलदार पाली
कोरोना सारख्या संकटकाळात शासकीय रक्तपेढी अलिबाग येथे रक्तांची गरज असताना पालीतील जागरूक रक्तदात्यांच्या सहकार्याने 70 रक्तदात्यांनी रक्तदान करत आम्हाला गरजेच्यावेळी महत्त्वाची मदत केली आहे.आम्ही त्यांचे आभारी आहोत.
डॉ दिपक गोसावी,शासकीय रक्तपेढी अलिबाग
आज मी पहिल्यांदाच रक्तदान केले. कोरोनाच्या संकट काळात रक्तदान करून मी माझे छोटेसे योगदान दिले आहे.रक्तदान करून मला खूपच आनंद वाटला.यापुढेही गरजेच्या वेळी मी माझे योगदान देत राहील.
मानसी म्हात्रे,पहिल्यांदाच रक्तदान करणारी रक्तदाती
या रक्तदान शिबिरात पालीतील लहान-मोठ्या सह महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तर अनेकांनी आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला.पोलादपूरचे 56 वर्षीय दत्ताराम साळुंखे व यांसारखे सर्व जागरूक रक्तदात्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे रक्तदान शिबीर पार पडले.







Be First to Comment